आत्मविश्वास हा प्रत्येकामध्ये निर्माण व्हावा असा सगळ्यांना वाटत असते ,आणि मी ह्या मराठी ब्लॉगवर(marathi blog)वरती सागण्याचा प्रयत्न करणार आहे .
sourc;google |
आता आपण खालील एक कथा समजून घेऊ .
कथा अशी आहे ,कि ,एका बादशहाने एकदा आपल्या वजिराला विचारले, "सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणते ,सांग बरे ?" वजिराने उत्तर दिले, "आत्मविश्वास!"
बादशहाला ते काही पटेना. त्याने वजिराची परीक्षा पाहण्याचे ठरविले. काही दिवसांनी बादशहाने वजीर निःशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडण्यस सांगीतले.
वजिराने हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले. त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिले. कुत्रे टॅहा ऽ टॅहा ऽ... करीत हत्तीच्या सोंडेवर आदळले. त्याचा पंजा व नखे हत्तीला बोचली. त्यामुळे हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूतसुद्धा क्षणभर घाबरला. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराजवळ आत्मविश्वास नसता तर त्याला संकटाला साहसाने तोंड देताच आले नसते. आत्मविश्वासाच्या सामर्थ्यावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. इस्त्रायलच्या वीर डेव्हिड या तरुणाने पॅलेस्टाईनमधील भीमकाय योद्धा गोलिधन याला केवळ गलोलीतून दगड मारून पराभूत केले. त्याच्याजवळ दुसरे कोणतेही शस्त्र नव्हते. पण जे शस्त्रांचे शस्त्र आहे तो आत्मविश्वास होता. आत्मविश्वास जागृत झाला की मनुष्यातील सर्व सुप्तशक्ती जागृत होतात. "अशक्य हा शब्द फक्त मूर्ख लोकांच्या शब्दकोशात आढळतो." हे नेपोलियनचे उद्गार आत्मविश्वासाचेच द्योतक आहेत.
ज्याचा आत्मविश्वास संपला त्याचे सारे काही संपले. या देशाचा इतिहास म्हणजे मूठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचा इतिहास. तुमचा ३३ कोटी देवांवर विश्वास असेल, पण तुमचा तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला कधीही मुक्ती मिळणार नाही. स्वामी विवेकानंद तरुणांना उद्देशून नेहमी असे आवाहन करीत व म्हणत, "शंभर आत्मविश्वासी तरुण मला मिळाले तर मी या देशाचा कायाकल्प घडवून आणेन." अलिबाबाच्या 'खुल जा सिमसिम' या शब्दाप्रमाणे आत्मविश्वास हा परवलीचा शब्द असून, तो आत्मोन्नीतीची गुहा उघडून उत्कर्ष, यश, नेतृत्व सन्मान यांचे रत्नभांडार आपल्यापुढे उभे करतो.
कैलोनाच्या स्टीफनला शत्रूनी कैद केले. त्याला दरडावून विचारले, "कोठे आहे तुझा किल्ला व तुझे साथीदार?" स्टीफनने आपल्या हृदयावर हात ठेवला व तो म्हणाला. "हा पाहा माझा अजिंक्य किल्ला, त्यातच माझे आत्मविश्वासाचे, जिवास जीव देणारे सैनिक आहेत. हा किल्ला अजिंक्यच आहे. लाख प्रयत्न करूनही तो नाही हस्तगत करता येणार तुम्हाला!" आत्मविश्वास म्हणजे अहंकार किंवा पोकळ वल्गना नव्हे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील अभंग विश्वास.
आत्मविश्वासाने कसे जगावे ?
माहितीचा अभाव (Marathi blog):- सध्याच्या विज्ञान युगात माहितीचा स्फोट होत आहे. नवीन नवीन तंत्रे उदयास येत आहेत. त्यांचा अभ्यास व अनुभव आत्मविश्वासासाठी अत्यावश्यक आहे.
मान्यता किंवा स्वीकृतीचा अभाव :- प्रत्येक माणसाला आपल्या प्रयत्नास कोणाची तरी शाबासकी हवी असते. दोन कौतुकाच्या शब्दांची गरज असते. प्रामाणिक स्तुती व स्नेहपूर्ण प्रोत्साहन याच्या जोरावर पालक, शिक्षक व समाज तरुणांमध्ये आत्मविश्वास जागृत करू शकतील. आपणच आपल्या कामगिरीचे यथार्थ मूल्यमापन करण्यास शिकलो, आपल्या उणिवा व आपले सामर्थ्य पाहू शकलो तर आत्मविश्वास व आंतरिक समाधान हे दोन पक्षी आपण एकाच झडपेत पकडू शकू, इतरांच्या मान्यतेची पण मग गरज उरत नाही.
0 टिप्पण्या