सदर घटना हि युरोप मधील एका क्रूर राजा संदर्भात घडलेली घटना आहे .या राजाचा दुर्दैवाने पेटून मृत्यू झाला आणि त्याला त्याचा पापाची शिक्षा मिळाली असे म्हणायला हरकत नाही .
source;google |
एका राजाची तब्येत खूप बिघडली. वैद्याने उपचार म्हणून त्याला दारूमध्ये भिजवलेल्या कपड्यात गुंडाळून ठेवायला सांगितले. त्याची सेवा करणाऱ्या एका दिढशहाण्या दासीला दुर्बुद्धी सुचली. राजाच्या अंगाभोवती कपडा गुंडाळून झाल्यानंतर धाग्याचे शेवटचे टोक कापण्यासाठी कात्रीऐवजी तिने दिवा वापरायचे ठरवले.
दारूमध्ये भिजलेले कापड पेट घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे म्हणा आणि ह्या अजब मरणातून राजा वाचू तरी शकणार आहे का?
अगदी असाच काहीसा प्रकार युरोपमधील एका दुष्ट राजाबरोबर घडला.
युरोपमधील नवरे भागाचा राजा चार्ल्स दुसरा मुळातच खुपु क्रूर होता. वयाच्या १७ व्या वर्षी राजकीय उलथापालथीनंतर गादी मिळाल्यानंतर त्याने पूर्ण आयुष्य द्वेषाने, बदला घेण्याच्या उद्देशाने राज्य करण्यात खर्ची घालविले. त्याने केलेल्या पापांची यादी खूपच लांबलचक होती.
इ. स. १३८७ साली वयाच्या ५४ व्या वर्षी हा राजा खूप आजारी पडला. डॉक्टरला बोलविण्यात आले. त्याने सांगितलेला उपाय पण खूप अजब होता. रात्री झोपताना राजाच्या अंगाभोवती वाईन पेयामध्ये भिजविलेला कपडा गुंडाळण्यास सांगितले जेणेकरून वाईन मध्ये असणारे औषधी गुण त्याच्या शरीरामध्ये उतरतील आणि त्याची व्याधी बरी होण्यास मदत होईल.
हि जबाबदारी राजाच्या दासीवर सोपविण्यात आली. रात्रीची वेळ होती. राजाला कापडामध्ये गुंडाळून झाल्यावर राहिलेला धागा कापण्यासाठी तिला कात्री मिळत नव्हती म्हणून तिने चक्क आगीचा वापर करून अतिरिक्त धागा जाळण्याचे ठरविले.
व्हायचे तेच झाले. दारू लगेच पेट घेते. तिने दिवा राजाच्या जवळ नेण्याची फुरसत कापडाने लगेच पेट घेतला. तिच्या डोळ्यासमोर राजा जळू लागला. तिला काहीच सुचेनासे झाले त्यामुळे तिथून फरार होण्यातच तिने धन्यता मानली.
काही मिनिटांच्या अवधीमध्ये राजा जळून खाक झाला.
अशा प्रकारे राजा चार्ल्स दुसरा ह्याचा अंत खूप भयानक होता. पण त्याने आयुष्यभर केलेली कुकर्मे बघता त्याला त्याच्या पापांची शिक्षाच मिळाली असे म्हणावे लागेल.
source; King Charles II Died a Horrible, Unfortunate Death.
0 टिप्पण्या