मित्रानो ,आज आपण अतिशय मनोरंजक जीवा विषयी माहिती घेणार आहोत ,आपल्या रंजक मराठी च्या टीम ने आपल्या साठी खास शोधाशोध करून माहिती मिळवली आहे . हॉर्स शू खेकडा(Horseshoe crab), जगातील सर्वात जुन्या सजिवांपैकी एक असणाऱ्या ह्या खेकड्याच्या एका लिटर रक्ताची किंमत आहे जवळपास ११ लाख रुपये!
Horseshoe crab वरचा भाग |
हॉर्स शू खेकड्याच्या अनोख्या निळ्या रक्ताचा(blue blood) वापर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे जीवाणूरहित करण्यासाठी केला जातो. तसेच काही औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.
मागील काही महिन्यांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगभरातील आघाडीच्या वैद्यकीय कंपन्या कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस शोधण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहेत. त्यातील काही औषधे व लसी प्राथमिक चाचण्यांमध्ये यशस्वी सुद्धा झाल्या आहेत.
लाखोंच्या संख्येने खेकडे पकडून प्रयोगशाळेत नेले जातात. तिथे ह्या खेकड्यांचा हृदयाला छोटेसे छिद्र पाडून त्यांच्या शरीरातील अंदाजे ३०% रक्त काचेच्या भांड्यात जमा केले जाते. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते.
माणसांचा जीव वाचविण्यासाठी चाललेला हा खटाटोप अनेक खेकड्यांच्या जीवावर बेततो. कित्येक खेकड्यांचा ह्या क्रियेदरम्यान मृत्यू होतो. तसेच वाचलेल्या माद्यांना नंतर प्रजननादरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो.
हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा ७० च्या दशकात सूरु झालेला वापर आजतागायत सुरू आहे. त्याऐवजी एखादा पर्यायी घटक प्रयोगशाळेत निर्माण करून लसींच्या चाचणींसाठी त्याचा वापर करता येईल का ह्याचा अभ्यास संशोधक करत आहेत. असे काम करणारा आरएफसी नावाचा एक घटक शोधण्यात सुद्धा आला आहे. पण खेकड्यांच्या रक्ताला पर्याय म्हणून खात्रीशीररित्या वापरता येऊ शकेल ह्या पातळीला अजून आपण पोचू शकलो नाही आहोत.
हॉर्स शू खेकड्यांबद्दल काही रंजक तथ्ये(Some interesting facts about horseshoe crabs)
- हॉर्स शू खेकडे जगाच्या पाठीवर ४५० दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहेत.
- त्यांची गणना जरी खेकड्यांत होत असली तरी ते कोळी व विंचवांशी जास्त निगडित आहेत.
- हॉर्स शू खेकड्यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत. त्यांच्या फक्त ४ जाती सध्या शिल्लक राहिल्या आहेत.
- त्यांच्या रक्ताला मिळणाऱ्या अमाप किमतीमुळे काळ्या बाजारात त्यांना प्रचंड मागणी आहे.
- माणसाच्या शरीरात लोह जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. त्याचप्रकारे हॉर्स शू खेकड्यांच्या शरीरात असणारे तांबे त्यांच्या रक्ताला निळा रंग प्राप्त करून देते.
0 टिप्पण्या