सीएनजी (CNG)म्हणजे काय ?

 CNG Full Form in Marathi;

       सीएनजी हा एक नैसर्गिक वायू आहे. या वायू चा वापर रिक्षा, बस, कार मध्ये इंधन म्हणून केला जातो. वाहनात मागच्या बाजूला एक गॅस च्या टाकी सारखी टाकी असते, त्यात हा CNG गॅस भरलेला असतो व त्याद्वारे वाहन चालवले जाते. सीएनजी गॅस हा पर्यावरणास हानी पोहोचवत नाही, यामुळे सरकार सुद्धा CNG चा वापर करावा असे आवाहन करते.

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/04/CNGFullForm.html
SOURCE;GOOGLE

 पेट्रोल व डिझेल सारख्या भयंकर प्रदूषण करणाऱ्या वायू च्या ऐवजी CNG Gas वापरला जाऊ शकतो, वापरला जातो. जगभरात या वायू चा वापर खूप वाढला आहे. आपण आजच्या लेखात CNG Full Form in Marathi ची माहिती CNG Gas Information in Marathi घेणार आहोत. CNG Gas काय असतो, याचे फायदे काय आहेत, याची वैशिष्ट्ये, CNG Gas मुळे होणारे नुकसान, ई हे सर्व या लेखात आपण शिकणार आहोत.

CNG चा फुल फॉर्म “Compressed Natural Gas” असा होतो व मराठी अर्थ “संकुचित नैसर्गिक वायू” असा होतो.

सीएनजी गॅस म्हणजे काय?

     CNG गॅस हा एका प्रकारचा नैसर्गिक वायू आहे, याचा उपयोग Petrol, Gas, Diesel किंवा LPG च्या ऐवजी वापरला जाऊ शकतो. CNG पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत खूप कमी प्रदूषण निर्माण करतो.

    CNG ला Ideal Fuel असे म्हणतात कारण हा गॅस जवळपास पूर्णपणे Burn होतो, यातून प्रदूषण करणारे वायू बाहेर पडतात परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी असते. पेट्रोल व डिझेल च्या ज्वलन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, आणि नायट्रोजन ऑक्साईड्स वायू उत्सर्जित होतात, जे पर्यावरणासाठी खूप विनाशकारी आहेत.

    सीएनजी वायू ला ठेवण्यासाठी Gas Cylinder एवढ्या टाकीचा वापर करतात. CNG गॅस 93.05% Methane, Nitrogen, Carbon Dioxide, Propane, आणि थोड्या प्रमाणात Ethane पासून बनवलेला असतो. हा वायू पर्यावरणदृष्ट्या एक स्वच्छ पर्यायी इंधन आहे, कारण याच्या ज्वलानाच्या प्रक्रियेत कमी प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतात.

सीएनजी गॅस चा शोध कोणी लावला?

          सीएनजी गॅस चा शोध सर्वात प्रथम अमेरिकेत लागला. “William Hart” या व्यक्तीने 1626 मध्ये प्रथम सीएनजी वायू चा शोध लावला. 1821 मध्ये William Hart यांनी न्यू यॉर्क मधील Fredonia या ठिकाणी नैसर्गिक वायू प्रत्यक्षात शोधून काढला.
त्यानंतर Fredonia Gas Light Company ची निर्मिती झाली, ही कंपनी अमेरिकेतील नैसर्गिक वायू वितरण करणारी पहिली कंपनी आहे. सीएनजी वाहन चा शोध सर्वात प्रथम अमेरिका मध्ये लागला, दुसऱ्या महायुद्धानंतर इटली, आणि इतर युरोपियन देशात CNG चा वापर इंधन म्हणून केला जाऊ लागला आणि आजच्या स्थितीला संपूर्ण जगात हा वायू वापरला जात आहे.

सीएनजी गॅस चे फायदे

सीएनजी गॅस खूप जास्त ठिकाणी वापरला जातो, याचे कारण म्हणजे CNG चे फायदे, ते खालीलप्रमाणे-
  • 1) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेने CNG गॅस स्वस्त मिळतो.
  • 2) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत मायलेज जास्त मिळते.
  • 3) या गॅस चे ज्वलन झाल्यावर जे वायू उत्सर्जित होतात ते पर्यावरणाला नुकसान दायक नसतात.
  • 4) सीएनजी वायू चे ज्वलनाचे तापमान जास्त असल्याने वाहनांना आग लागण्याचा धोका कमी होतो.
  • 5) सीएनजी गॅस वापरणाऱ्या इंजिन मधून आवाज कमी येतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते.

सीएनजी गॅस चे तोटे

 आपल्याला प्रश्न पडला असेल की हा गॅस अजून पेट्रोल वर डिझेल ला मागे का टाकू शकला नाही, तर याचे कारण आपल्याला सीएनजी गॅस चे तोटे वाचून समजेल.
  • 1) आताच्या परिस्थितीत सीएनजी गॅस चे सर्विस स्टेशन खूप कमी आहेत.
  • 2) CNG Tank व इंजिन जोडायला खूप खर्च येतो.
  • 3) CNG Cylinder जोडण्यासाठी खूप जागा लागते व यांचे वजनही खूप असते.
  • 4) CNG वायू गंधहीन आहे, त्यामुळे कुठे लिकेज असेल तर कळणे खूप अवघड आहे.
  • 5) CNG गॅस वापरल्याने वाहनाचा Exhaust Valve खूप लवकर खराब होतो, त्याला वारंवार बदलावे लागते.

निष्कर्ष –

    आज आपण CNG गॅस ची माहिती, CNG Gas Information in Marathi व CNG Full Form in Marathi पाहिला. मला आशा आहे की वरील माहिती समजण्यास आपल्याला काहीही अडचण आली नसेल. तरी आपल्या मनात थोडीसी सुद्धा शंका असेल तर कंमेंट करून नक्की विचारा.

    आजच्या काळात वाढते प्रदूषण ही पर्यावरणासाठी सर्वात मोठी समस्या आहे आणि यात सर्वात मोठा वाटा रस्त्यावर चालणाऱ्या पेट्रोल व डिझेल वाहनाचा आहे. प्रदूषण कमी करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, त्यासाठी आपण CNG वाहनाचा वापर केला पाहिजे किंवा नवीन आलेल्या Electric Vehicles तर खूपच उत्तम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.