चला तर पाहूया नेमकं क्रिप्टोकरन्सी
> ( Cryptocurrency Meaning In Marathi ). बिटकॉईनची सुरुवात कोणी केली? कशासाठी केली?जेव्हापासून जगाला बिटकॉईन किंवा एथेरियम यांसारख्या दिग्गज क्रिप्टोकरन्सींसोबत ओळख झाली आहे तेव्हापासून जगभरात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे मालक एलोन मस्क (Elon Musk), अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा (Jack Ma), मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स (Bill Gates) तसेच आपल्या आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी क्रिप्टोकरन्सीला भविष्यातील चलन म्हणून संबोधले आहे.
क्रिप्टोकरन्सी(Cryptocurrency Meaning In Marathi).
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे. ज्याच्यावर सेंट्रल बँक किंवा कोणत्याही इतर आर्थिक संस्थांचे कोणतेच नियंत्रण नसते.
क्रिप्टोकरन्सीचे प्रकार Types of Cryptocurrency In Marathi.
बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Meaning In Marathi.
बिटकॉईनचा शोध सतोशी नाकामोटो ( Satoshi Nakamoto ) यांनी २००९ मध्ये लावला. परंतु आजच्या वेळी बिटकॉईनच्या या शोधकर्त्या बद्दल कोणालाही ठावूक नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून तेच सतोशी नाकामोटो असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. परंतु आजपर्यंत या बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी च्या खऱ्या प्रोग्रामरचा पत्ता लागू शकलेला नाही.
आजच्या काळात अनेक प्रोग्रामर या बिटकॉईन ला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिटकॉईनची सुरुवात करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे चलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय पाठवणे हा होता. आणि जगभरात यासाठी लागणारे सॉफ्टवेअर्सही तयार करण्यात आले आहेत.
बिटकॉईन ही जगातील सगळ्यात जुनी क्रिप्टोकरन्सी आहे. या बिटकॉईनला जास्तीत जास्त लोकांकडून खरेदी करण्यात येत असल्यामुळे याची किंमत सतत वाढत चालली आहे.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर २०१६ मध्ये एका बिटकॉईनची किंमत ३०,००० च्या आसपास होती परंतु आज २०२१ मध्ये याच बिटकॉईनची किंमत ४० लाखांहूनही अधिक आहे. आणि यामुळेच याची किंमत याच्या मागणीनुसार सतत बदलत असते.
0 टिप्पण्या