बर्म्युडा ट्रँगल(The Bermuda Triangle) ट्रायएंगल हा उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिम भागाचा एक प्रदेश आहे जो साधारणपणेअमेरिकेच्या मियामी, बर्म्युडा आणि पोर्टो रिकोच्या दरम्यान ५००००० चौरस क्षेत्रात पसरलेला आहे . अशा बर्म्युडा ट्रँगल मध्ये डझनभर जहाजे आणि विमान रहस्यमयपणे गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत .
source;google |
Bermuda Triangle चे रहस्य
फ्लोरिडा, बर्मुडा आणि प्यूटो रिकाच्या दरम्यान असलेल्या Bermuda Triangle वरून जाणारे समुद्री जहाज आणि विमान अचानक गायब होत असल्याच्या घटना अनेकवेळा झाल्या आहेत. जगात ह्या परिसरातचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करीत होते.
Bermuda Triangle च्या खतरनाक परिसरातून जाणाऱ्या जहाज आणि विमानांना वेगळ्याच भयावह वातावरणातून जावं लागतं. या परिसरात आल्यानंतर खराब वातावरणामुळे जहाज बुडतात तर, विमानेही आपली दिशा भरकटून बुडतात अशी प्रकरणे घडली आहेत.
अशी कोणती भौगोलिक कारणे आहेत. की ज्यामुळे या परिसरात जाणारी विमाने आणि जहाजं समुद्री चक्रीवादळाच्या गर्तेत अडकून बुडतात. याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञ घेत होते. अनेक दशकांपासून वैज्ञानिक हे गुढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
source;google |
ख्रिस्तोफर कोलंबस यांच्यापासून ते आताच्या नवोदित वैज्ञांनिकापर्यंत या रहस्याविषयी अनेकांनी लिहलं आहे.
या परिसरातील समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे तेथील पाण्याचे घनत्व कमी होते. त्यामुळे मोठी जहाज बुडतात. तसेच या समुद्रात अनेक छोटीमोठी बेटं आहेत. ज्याची टक्कर होऊनही जहाजं बुडू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.
0 टिप्पण्या