नथवाला मासा(Tor Tor),महासिर मासा.

          गोड्या पाण्यातील चविष्ट मासा अशी त्याची ओळख आहे."महासिर मासा ज्याला नथवाला मासा म्हणून ओळखलं जातं.

https://ranjkmarathi.blogspot.com/tor-tor.html
ranjkmarathi.blogspot.com


         मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने महसीर हा शब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला खडवी, खडची, मस्ता, महाला व मस्तर अशी नावे आहेत. बंगाली भाषेत त्याला टॉर, महासीर, मासीर, महासार व महासाल अशी नावे आहेत. महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. त्याच्या मोठ्या कल्ल्यामूळे त्याला नथवाला मासा म्हणतात.

       भारतामध्ये हिमालय पर्वताच्या पायथ्याच्या टेकड्यांत असणाऱ्या जलाशयात (काश्मिरपासून आसामपर्यंत) आणि पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांतील नद्या व तलाव यांत महसीर आढळतो. नर्मदा आणि तापी या नद्यांत त्यांची मासेपकड मोठ्या प्रमाणात केली जाते महसिराची लांबी सु. १·५ मी. असून वजन ५०–५४ किग्रॅ. असते. पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा पुढे नामशेष झाला. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देहु-आळंदीला येणारा प्रत्येक भाविक पूर्वी इंद्रायणी नदीतल्या महाशीर अर्थात देवमाशाचं दर्शन घेतल्याशिवाय परतत नसे. ९० च्या दशकात नदीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे हा मासा इंद्रायणीतून नामशेष झाला. गोदावरी नदीत हा अजून बर्‍यापेकी दिसून येतो.

         मध्यप्रदेशात हा मासा संरक्षित आहे. नर्मदा आणि तापी नदीतील बेसुमार मासेमारीमुळे याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

         आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याने या माशाला लुप्त होत असलेली प्रजाती म्हणून घोषित केलं आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.