सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.

 This queen used to burn her lovers alive after sex; Queen Ngola.

एकेकाळी अफ्रिकेतल्या अंगोला देशात राहाणाऱ्या एनजिंगा एमबांदी या राणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एक हुशार आणि शूर योद्धा म्हणून तिची ख्याती होती. या राणीने 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवाद्यांना विरोध केला होता.



मात्र काही लोक त्यांना एक क्रूर महिला म्हणूनही ओळखतात, सत्ता मिळवण्यासाठी या राणीनं आपल्या भावालाही मारलं असं सांगितलं जातं.

इतकंच नाही तर आपल्या हरममध्ये असलेल्या पुरुषांशी एकदा संभोग केल्यावर ती त्यांना जिवंत जाळत असे असं हे लोक म्हणतात

परंतु ही एनजिंगा राणी अफ्रिकेतल्या सर्वांत लोकप्रिय महिलांपैकी एक आहे यावर मात्र इतिहास अभ्यासकांचं एकमत आहे.

राणी एनगोलाच्याच नावावरुन देशाला नाव पडलं.

एमबांदू लोकांचं नेतृत्व करणारी एनजिंगा ही नैऋत्य अफ्रिकेतील एनदोंगो आणि मतांबाची राणी होती.

पण स्थानिक भाषा किमबांदूमध्ये एनजिंगाला एनगोला म्हटलं जात असे. याच नावानं पोर्तुगीज लोक या प्रदेशाला ओळखत असत.

त्यानंतर या प्रदेशाला अंगोला म्हटलं जाऊ लागलं.

या प्रदेशाला हे नाव पोर्तुगालच्या सैनिकांनी एनदोंगोवर सोन्या-चांदीचा शोध घेताना हल्ला केल्यावर मिळालं.

पण जेव्हा त्यांना तिथं सोनं आणि चांदी काहीच मिळालं नाही तेव्हा त्यांनी इथल्या मजुरांचा ब्राझीलमधील वसाहतीशी व्यापार सुरू केला.

पोर्तुगीजांच्या या हल्ल्यानंतर 8 वर्षांनी एनजिंगाचा जन्म झाला. आपले वडील राजे एमबांदी किलुंजी यांच्याबरोबर तिनं लहानपणापासून आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्यांविरोधात संघर्ष केला होता.

1617मध्ये राजे एमबांदी किलुंजी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे एक पुत्र एनगोला एमबांदी यांनी सर्व सत्तासूत्रं सांभाळली.

परंतु त्यांच्याकडे आपल्या वडीलांसारखं प्रभावी व्यक्तिमत्व आणि बहीण एनजिंगासारखी बुद्धी नव्हती.

लोक एनजिंगातर्फे आपल्याविरोधात षड्यंत्र रचत आहे अशी त्याला भीती वाटू लागली. या भीतीपोटीच एनगोला एमबांदीने एनजिंगाच्या मुलाला मारण्याची शिक्षा घोषित केली.

परंतु युरोपियन सत्तांच्या आक्रमणांसमोर त्यांना लढणं अशक्य होऊ लागलं तेव्हा एनगोला एमबांदी यांनी आपल्या जवळच्या एका सहकाऱ्याचा सल्ला मान्य केला.

पोर्तुगालविरोधात समझोत्याचं राजकारण.

यानंतर राजा एनगोला एमबांदीनी आपल्या बहिणीला सत्तेत वाटा द्यायचा ठरवलं.

पोर्तुगीज मिशनऱ्यांकडून पोर्तुगीज शिकणारी एनजिंगा एक प्रतिभावान रणनितीकार होती.

अशातच एनजिंगा जेव्हा पोर्तुगीजांशी चर्चा सुरू करण्यासाठी लुआंडाला पोहोचली तेव्हा तिला काळे, गोरे आणि अनेक मिश्र संकर झालेले लोक दिसले. असं दृश्य तिनं पहिल्यांदाच पाहिलं होचं. पण त्याऐवजी तिला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं.

खरंतर तिथं गुलामांना एका ओळीत उभं करून मोठमोठ्या जहाजांतून नेण्यात येत होतं. काही वर्षांतच लुआंडा हा अफ्रिकेतला गुलांमाचं सर्वात मोठं केंद्र बनलं.

एनजिंगा जेव्हा पोर्तुगीज गव्हर्नर जोआओ कोरिए डे सोउसा यांच्याबरोबर शांतताचर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेली तेव्हा तिच्याशी करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल इतिहासकारांनी टिप्पण्या केल्या आहेत.

जेव्हा एनजिंगा तिथं गेली तेव्हा पोर्तुगीज आरामदायक खुर्च्यांवर बसले होते आणि तिच्यासाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यावर एनजिंगा एक शब्दही बोलली नाही. तिनं नजरेने केवळ एक इशारा केला आणि त्याबरोबर तिचा नोकर खुर्चीसारखा तिच्यासमोर बसला. मग एनजिंगा त्याच्या पाठीवर बसली आणि गव्हर्नर बरोबरच्या उंचीवर आली.

त्यावर एनजिंगा म्हणाली मला तुमच्याशी समान पातळीवर येऊन बोलणी करायची आहेत.

बराचवेळ चर्चा झाल्यावर पोर्तुगीज सैन्य एनदोंगो सोडून जाईल आणि त्या देशाचं सार्वभौमत्व मान्य करेल यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली. मात्र याबदल्यात या क्षेत्राला व्यापारी मार्ग बनवण्यासाठी खुलं केलं जाईल असं एनजिंगानं मान्य केलं.

पोर्तुगीजांशी संबंध सुधारण्यासाठी एनजिंगानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि अना डे सूजा हे नवं नाव घेतलं. त्यावेळेस ती 40 वर्षांची होती.

जेव्हा एनजिंगा राणी होते.

1624मध्ये एनजिंगाचा भाऊ एका बेटावर जाऊन राहिला. काही काळानंतर त्याचं तिथंच निधन झालं. त्याच्या मृत्यूच्याही अनेक कथा सांगितल्या जातात. एनजिंगानं आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या विष दिलं असं सांगितलं जातं तर काही लोक त्यानं आत्महत्या केली असं सांगतात.

अशा काळात एनजिंगा एमबांदेनं पोर्तुगीजांना आणि काही आपल्या अडचणींचा सामना करून एनदोंगोंची पहिली शासक राणी बनण्याची कामगिरी करून दाखवली.

अंगोलाच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे संचालक जाओ पेड्रो लॉरेंको यांच्यामतानुसार, 'अफ्रिकेत गेल्या काही युगांपासून सुरू असलेल्या महिला शोषणाविरोधात एनजिंगा एमबांदे एका शक्तिशाली आवाजासारख्या आहेत.'

ते सांगतात, 'त्यांच्यासारख्या अनेक व्यक्तिमत्वं आहेत, त्यांच्यामुळे अफ्रिकेतील व्यवस्थेत राहून महिलांनी या द्वीपकल्पाच्या विकासासाठी योगदान दिल्याचं समजतं.'

काही सूत्रांच्यामते एनजिंगाचं वर्तन क्रूर होतं.

उदाहरण द्यायचं झालं तर राज्याच्या सीमेवर राहाणाऱ्या इमबांगाला योद्धांची मदत घेऊन आपल्य़ा प्रतिद्वंद्यांना घाबरवून स्वतःचं स्थान बळकट करणं वगैरे...

काही वर्षं आपलं राज्य सांभाळल्यावर एनजिंगानं शेजारचं मुतांबा राज्यावर कब्जा केला. तसेच स्वतःच्या राज्याच्या सीमांचं रक्षणही केलं.

ब्राझिलियन आणि पोर्तुगीज लेखिका एडुआर्डो अगुआलुसा सांगतात, राणी एनजिंगा युद्धभूमितील एक योद्धाच नाही तर एक महान रणनितीकार आणि मुत्सद्दी होती.

'ती पोर्तुगीजांच्या विरोधात लढली आणि तिनं डचांशी मैत्री केली. जेव्हा दुसऱ्या राज्यांशी संघर्ष व्हायचा तेव्हा ती पोर्तुगीजांची मदत घ्यायची', असं त्या सांगतात.

सेक्स स्लेवसंबंधित कहाणी.

फ्रेंच विचारवंत मार्किस दे सादे यांनी इटालियन मिशनरी गिओवनी कावेजी यांच्या गोष्टींवर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव 'द फिलॉसॉफी ऑफ द ड्रेसिंग टेबल' असं आहे.

एनजिंगा आपल्या प्रियकरांबरोबर सेक्स केल्यानंतर त्यांना जाळून मारत असे असा दावा कावेजी यांनी केला आहे. त्यांच्या हरम ला 'चिबदोस' असं म्हटलं जाई. त्यात राहाणाऱ्या पुरुषांना महिलांचे कपडे दिले जात.

इतकंच नाही तर राणीला जर उपलब्ध पुरुषांपैकी कोणाशी सेक्स करायचं असेल तर तिथं राहाणाऱ्या पुरुषांनी एकमेकांशी मृत्यू येईपर्यंत लढावं लागे. जिंकणाऱ्या मुलाला जे मिळत असे ते जास्तच घातक असे.

या जिंकणाऱ्या पुरुषांना सेक्सनंतर जाळून मारलं जाई. अर्थात कावेजी यांच्या या कहाण्या दुसऱ्या लोकांच्या मतांवर आधारित आहेत. काही इतिहासकारांच्या मते या कहाण्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या गेल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.