फोटो बघून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडला असाल ना कि अश्या प्रकारचा प्राणी खरंच अस्तित्वात असेल का? जर हा प्राणी असेल तर मग ह्याला चोच कशी आणि जर पक्षी असेल तर ४ पाय कसे?
souce;google |
किंबहुना, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा शास्त्रज्ञांना ह्या प्राण्यावर संशोधन करायची विनंती करण्यात आली तेव्हा नमुने बघून ते पण बुचकळ्यात पडले. इतकेच नव्हे त्यांना पण असेच वाटले कि हा काहीतरी थट्टेचाच प्रकार आहे. कोणीतरी मुद्दाम म्हणून त्या प्राण्याचे अवशेष कृत्रिमरीत्या बनवून, किंवा दोन तीन वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष एकत्र करून त्यांच्यासमोर ठेवले आहेत.
तसेच हा प्राणी जेव्हा सर्वप्रथम इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी नेण्यात आला (मृत नमुना) तेव्हा पण ब्रिटिशाना पण हा एक 'प्रॅन्क' (खोडी) आहे असेच वाटले.
पण तसे काही नाही आहे. हा जगातील सर्वांत रहस्यमय प्राण्यांपैकी एक म्हणजे प्लॅटिपस (platypus) हा प्राणी आहे. तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतो.
प्लॅटिपस(platypus) प्राण्याला रहस्यमय प्राणी असे का बोलले जाते त्याची काही कारणे पुढे देत आहे.
शिकागोतील 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम'मधील संशोधकांनी अलीकडेच एका अहवालात सांगितले की, उन्हात हे प्राणी सूर्यप्रकाश शोषून ठेवतात आणि काळोखात ती ऊर्जा वापरून चमकू लागतात. याला 'बायोफ्लुरोसेन्स' असे म्हणतात. ही एक प्रकारची जीवदीप्तीच आहे. मात्र जीवदीप्ती दर्शवणाऱ्या प्राण्यांत ठराविक रसायने असतात. एकमेकांबरोबर संवादासाठी किंवा छद्मावरण म्हणून हे 'बायोफ्लुरोसेन्स' वापरले जाते.
प्लॅटिपस (platypus) प्राण्याला पोट नसते. त्या ऐवजी ह्याचा अन्नमार्ग हा सरळ आतड्यांशी जोडलेला असतो.
ह्याला काही पक्षांप्रमाणे भली मोठी चोच आणि पायाला बोटांच्या मध्ये पडदे असतात.
ह्याला बीव्हर प्राण्याप्रमाणे शेपटी असते.
ह्याचे शरीर हे पाणमांजराशी मिळतेजुळते असते.
प्लॅटिपस (platypus) नरांमध्ये एक प्रकारचे विष असते. त्यांच्या मागच्या पायाला अणकुचीदार नांग्या असतात ज्याद्वारे ते विष सोडू शकतातआणि ह्याचा वापर ते बचावासाठी करतात.
सस्तन प्राणी असून पण प्लॅटिपस (platypus) मादी अंडी देते. ह्या प्राण्याव्यतिरिक्त जगामध्ये इचिडना हा फक्त दुसरा सस्तन प्राणी आहे जो अंडी देतो.
जरी ह्या प्राण्याची पिल्ले हि दुधावर जगत असली तरी माद्यांना स्तनाग्रे नसतात.
0 टिप्पण्या