चंगेझ खान Genghis Khan in marathi. नीशोंपूर नावाचं एक गाव. तिथल्या तिरंदाजाने एका राजकुमाराची हत्या केली. आणि त्याचा सूड म्हणून गावावर हल्ला झाला. एका जीवाचा बदला म्हणून संपूर्ण गावाने आपला जीव गमावला. माणसं तर माणसं जनावरांनी - कुत्र्यांनी - मांजरांनी सुद्धा जीव गमावला आणि एका रात्रीत त्या गावाचं रूपांतर स्मशानात झालं !
चंगेझ खान
Changez Khan history in Marathi
जगातील अधिकांश भागावर राज्य करणारा असाही एक क्रूरकर्मा… चंगेज खान changez Khan history in Marathi
तो विश्वातील सर्वात निर्दयी शासक तर होताच त्याशिवाय अत्यंत अनुशासनप्रिय, शक्तिशाली, धूर्त मंगोल शासक सुद्धा होता. आपल्या रणनीतीने व कुशलतेच्या बळावर १२०६ ते इ .स . १२२७ दरम्यान युरोप आणि एशियातील बऱ्याचशा भागावर कब्जा मिळवून मंगोल साम्राज्याचा विस्तार केला आणि म्हणून त्याची गणना विश्वातील महान शासकांमध्ये होते.
मंगोल शासक चंगेज खान समोर संपूर्ण जग जिंकणारा सिकंदर आणि ज्युलियस सिजर सारखे महारथी देखील पाणी भरत होते. हरफनमौला व्यक्तिमत्व असलेला हा शासक शहरी जीवनमानाचा अत्यंत द्वेष करीत होता. त्याने आणि त्याच्या क्रूर सैन्याने अनेक शहरांना नेस्तनाबूत करून विचलित करणारी भयंकर परिस्थिती निर्माण केली. जगातील सर्वात क्रूर सेनापती चंगेज खान ने जवळजवळ संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त केला होता.
त्याने सुरुवातीलाच युरोप आणि एशीयाच्या बऱ्याचशा भागाला नेस्तनाबूत केले. त्यानंतर त्याने मंगोलच्या पूर्वेला चीन मधील ‘किन साम्राज्याला ‘ देखील उध्वस्त केले. पुढे त्याने कोरियावर विजय प्राप्त केला.
इतकेच नव्हे तर त्याच्या क्रूरतेचा अंदाज या गोष्टीवरून देखील येतो कि चीनच्या दक्षिणेकडील असलेल्या शुंग साम्राज्याने त्याला अनेक युद्धांमध्ये मदत केली होती तरी देखील त्याने त्यांचा देखील विनाश केला.
खरंतर तो सर्व धर्मांचे पालन करणारा होता. कोणत्याही एका धर्माचे त्याने आपल्या जीवनात अनुसरण केले नाही.
परंतु काही इतिहासकारांच्या मते तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता.
या लेखातून इतिहासातील सर्वात निर्दयी आणि क्रूर मंगोल सेनापती चंगेज खान विषयी अधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
चगेज खान चा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Genghis Khan Biography or Genghis Khan Descendants
जगातील सर्वात क्रूर सेनापती चंगेज खान चा जन्म इसवीसन ११६२ ला मंगोलियाच्या उत्तरी भागात ओनोन नदीच्या तीरावर झाला. बालपणी त्याला तेमुजीन या नावाने हाक मारत असत. त्याच्या वडिलांचे नाव येसुजेई बगातूर, ते कियात कबिल्याचे सरदार होते. असं म्हणतात कि चंगेज खान च्या उजव्या हातावर जन्मतः रक्ताचा डाग होता. त्याला ४ बहीण भाऊ होते.
अत्यंत कठीण परिस्थितीत व्यतीत झाले चंगेज खान चे बालपण – Genghis Khan Biography
चंगेज खानला बालपणीच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. तो जेंव्हा जेमतेम १० वर्षांचा होता त्यावेळी कबिल्यात झालेल्या भांडणात त्याच्या वडिलांची अत्यंत निर्मम पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर चंगेज खान ने हिम्मत न हारता तो पुढे जात राहिला.
खरंतर वडलांच्या हत्येमुळे त्याच्यातील भय संपले आणि त्याची जागा क्रूरतेने घेतली. त्याने युद्ध कौशल्यात नैपुण्य मिळविले. हळू हळू आपल्यातील संघटन बळाच्या कौशल्यावर त्याने भटक्या समुदायांना एकत्र केलं आणि एक मोठी ताकद जमवून पुढे आला.
चंगेज खान चा विवाह – Genghis Khan Marriage
आपल्या क्रूरतेमुळे ओळख बनविणाऱ्या चंगेज खान चा विवाह वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी बोर्ते सोबत झाला. लग्नानंतर काही दिवसांनंतरच विद्रोही कबिल्याने त्याच्या पत्नीचे अपहरण केले. तिला सोडवण्याकरता चंगेज खान ला खूप संघर्ष आणि लढाया कराव्या लागल्या.
या गंभीर परिस्थितीतही त्याने काही मित्र जमविले. त्यातही ‘बोघुरचू’ करता त्याच्या मनात विशेष स्थान होते. आपल्या मित्रांच्यामदतीने त्याने आपली पत्नी बोर्ते ची सुटका केली.
जमूका समवेत होते चंगेजखान चे वैरत्व: (Jamuka was accompanied by Genghis Khan's animosity:)
चंगेज खान चा सख्खा भाऊ जमूका हा त्याचा सर्वात विश्वासपात्र साथीदार होता. परंतु काही काळानंतर तोच त्याचा मोठा शत्रू देखील झाला. चंगेज खानने आपल्या काकांच्या (तुगरील) सोबतीने जमूकाचा पराभव केला.
जमुकाला पराजित केल्यानंतर चंगेज खानची सैन्य शक्ती अधिक मजबूत झाली आणि त्याचा आत्मविश्वास देखील दुणावला होता. पुढे त्याने कबिल्या विरोधात युद्ध पुकारले, पण त्या आधी त्याने आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेतला होता.
आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेतला: (Avenged his father's murder)
ज्या वेळेस चंगेज खान थोडा मोठा झाला तेंव्हा त्याने भटक्या समुदायाला एकत्र करून काही कबिल्यांचा नायनाट करीत आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेतला.
इतिहासकारांच्या मते त्याच्या वडिलांची, त्याचे काका ओंग खान आणि शक्तिशाली तार्तार कैराईट यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
त्यानंतर इसवीसन १२०३ ला चंगेज खान ने आपल्या पित्याचा हत्यारा ओंग खान विरोधात युद्ध छेडले आणि १२०६ ला आपल्या सख्खा भाऊ जमूका ला हरविल्यानंतर तो स्टेपी क्षेत्राचा सर्वात ताकतवर आणि शक्तिशाली योद्धा झाला.
चंगेज खान चा ‘कैगन’ अर्थात विश्वसम्राट उपाधीने गौरव करण्यात आला: (Genghis Khan was honored with the title of 'Cagan')
चंगेज खानाची अद्भुत ताकत पाहता जम्कुआ आणि केरियीत त्याचे सर्वात मोठे शत्रू झाले होते. पण चंगेज खानने त्यांची देखील हत्या करून त्यांचा काटा काढला.
इसवीसन १२०६ ला त्याचा वाढता प्रभाव बघता मंगोलोच्या कुरिल्ताई सभेने त्याला आपला सरदार घोषित केले. चंगेज खान ला ‘कैगन’ ( सम्राट किंवा सरदार) या सार्वभौम शासकाची (विश्वासम्राट) उपाधी देण्यात आली.
यासोबतच त्याला महानायक म्हणून देखील घोषित करण्यात आले. पुढे तो चंगेज खान या नावाने प्रसीध्द झाला.
अनेक कबिल्याना ताब्यात घेत चंगेज खानाने केली विजयी अभियानाला सुरुवात : (Genghis Khan's conquest of several tribes began)
मंगोलोच्या कुरिल्ताई सरदार झाल्यानंतर चंगेज खान अत्यंत शक्तिशाली शासक झाला होता, त्याने आपल्या सैन्य आणि युद्ध कौशल्याने एक विशाल सेना तयार केली होती. असं म्हणतात, त्याचं क्रूर सैन्य जिथूनही जायचं ते विध्वंसाच्या अनेक कहाण्या मागे ठेऊनच. जगातील या सर्वात क्रूरकर्म्या चंगेज खानाने अगदी सुरुवातीला चीन मध्ये विध्वंसाचे त्याच्या क्रूरतेचा कळस गाठणारे रक्तरंजित दृश्य उभे केले होते.
चंगेज खानाच्या क्रूर मंगोल सैन्याने इसवी १२०९ ला चीन च्या उत्तर-पश्चिमी प्रांतातील मूळ तिबेटीयन सी-लिया लोकांना अत्यंत वाईट रीतीने पराजित केले. त्यानंतर १२१५ ला पेकिंग (आजचे बीजिंग) वर विजय मिळविला आणि आपले मंगोल साम्राज्य स्थापित केले. आणि मग त्यांनी दक्षिणेकडच्या शुंग साम्राज्य, ज्यांनी अनेक युद्धांमध्ये त्यांना सहकार्य केले होते त्यांनाही नेस्तनाबूत करून टाकले.
इसवी १२३४ पर्यंत चंगेज खानाने चिनी राजवंशा विरुद्ध मोठ्या प्रमाणात विद्रोह केला. त्यानंतर तो पुन्हा मंगोलियाला परत गेला. त्यानंतर चंगेज खानाने आपले विजयी अभियान युरोप कडे वळविले. इसवी १२१८ ला कारा खितई ला हरविल्यानंतर ख्वारिज्म च्या दिशेने आपला विजयरथ वळविला.
इसवीसन १२०६ ते १२२७ पर्यंत चंगेज खानने चीनपासून समरकंद (उज्बेकिस्तान), बुखारा (उज्बेकिस्तान), मर्व, निशापूर, ओट्रार, बल्ख, हेरात, आणि गुरगंज सारख्या जगातील अनेक मोठ्या राज्यांवर विजय मिळवत आपले मंगोल साम्राज्य स्थापित केले.
अश्या तऱ्हेने चंगेज खान अवघ्या विश्वातील जवळजवळ ३ करोड ३० लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर राज्य करणारा सर्वात पहिला शासक झाला. त्याच्या नंतर आजतागायत कोणताही शासक इतक्या विशाल क्षेत्रावर साम्राज्य स्थापित करू शकलेला नाही.
चंगेज खान चे सैन्य आणि युद्ध कौशल्य व विजयाचे रहस्य: (Secrets of Genghis Khan's Military and War Skills and Victory)
जगातील सर्वात क्रूर सेनापती चंगेज खान हा आपल्या युद्ध कौशल्या करता ओळखला जायचा. ज्या राज्यात साम्राज्य स्थापित करण्याचे मनसुबे तो आखायचा त्या राज्याला आपल्या अद्भुत युद्ध कौशल्याने तो हस्तगत करायचाच. चंगेज खान अत्यंत हुशारीने आणि सावधानतेने युद्ध करायचा. आपल्या सैनिकांना तो विशेष प्रशिक्षण देत असे.
युद्धाचा वेग पाहता तेंव्हा घोड्यांचा उपयोग होत असे. त्यामुळे तो आपल्या सर्व घोड्यांना युद्धा करता प्रशिक्षित करीत असे. युद्ध क्षेत्रात लढाई करताना जर एखाद्या सैनिकाचा घोडा मारला गेला तर तो लगेच त्या जागी दुसरा घोडा पाठवत असे.
आपल्या क्रूरतेमुळे ओळखल्या जाणाऱ्या मंगोलच्या शासक चंगेज खानने आपल्या शत्रू विरुद्ध अश्या लढाया देखील जिंकल्या ज्यात चंगेज खानाचे सैन्य शत्रूच्या सैन्याच्या तुलनेत कमी होते, परंतु चांगले संघटन आणि अनुशासनाच्या बळावर विजय शक्यतो चंगेज खानाचाच होत असे.
कित्येक इतिहासकार चंगेज खानाच्या यशाचे श्रेय त्याच्या सैन्याच्या चपळतेला आणि उत्साहाला देखील देतात. त्याच्या सैन्याचा उद्देश संपूर्ण जगावर विजय प्राप्त करणे हाच होता. या व्यतिरिक्त प्रशिक्षित घोडेस्वार, युद्धात आगीच्या गोळ्यांचा केला जाणारा वापर त्याच्या विजयाला अधिक सोपे करत गेले.
सम्राट चंगेज खानच्या म्हणण्यानुसार जे लोक कर देण्यास तयार होत असत त्या शासकांना चंगेज खान नुकसान पोहोचवीत नसे, ज्या ज्या प्रांतावर त्याने मंगोल साम्राज्य स्थापित केले होते त्याची जवाबदारी त्याने आपल्या अत्यंत विश्वासू, अनुशासित, व योग्य व्यक्तींवर सोपवली होती. विश्वातील इतक्या मोठ्या भागावर यशस्वीपणे राज्य करण्याचे हे देखील एक प्रमुख कारण होते.
अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयतेने ४ करोड लोकांना संपविणारा नरसंहारक (Genocide that brutally and ruthlessly killed 40 million people)
चंगेज खान ला अखिल विश्वातील सगळ्यात क्रूर सेनापती बोलल्या गेले आहे त्याचे कारण म्हणजे तो ज्या क्षेत्रातून जात असे त्या ठिकाणी तबाही आणि विध्वंसाचे असे चित्र उभे राहात असे की विचार करणाऱ्याच्या अंगावर देखील काटा उभा राहील.
तो शहर च्या शहर नेस्तनाबूत करून टाकायचा. लहान मुलांना, तरुणांना, आणि महिलांना इतक्या अमानुषपणे संपवायचा कि पाहणाऱ्याच्या डोळ्यातून रक्त बाहेर यावे.
आपल्या विजयी अभियाना दरम्यान त्याने इराण मधील ७५ टक्के लोकसंख्या संपविली. त्याने प्रेतांचे आणि विध्वंसाचे असे भयंकर चित्र उभे केले ज्याची कधी कुणी कल्पना देखील केली नसेल.
चंगेज खान ने अत्यंत निर्दयतेने उज्बेकिस्तान मधील बुखारा आणि समरकंद ही सगळ्यात मोठी शहर अक्षरशः जाळून टाकली. त्याच्या या क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या कुकर्मामुळे हजारो लोक जळून राख झाले.
त्याच्या दहशतीने लोक भयग्रस्त जीवन व्यतीत करू लागले: (Due to his terror, people started living in fear)
दुसरीकडे लाखो महिला त्याच्या विकृतीच्या शिकार झाल्या होत्या. चंगेज खान ने लाखो महिलांवर बलात्कार, अमानुष अत्याचार करीत त्यांचे शोषण केले. संपूर्ण विश्वात त्याची इतकी भीती पसरली होती कि केवळ त्याचे नाव ऐकून देखील लोक थरथर कापू लागले होते.
भारताला नामशेष करण्याचा होता चंगेज खान चा हेतू, पण विचार बदलल्याने परतला माघारी (Genghis Khan's intention was to annihilate India, but changed his mind and returned)
विश्वातील सगळ्यात क्रूरकर्मा निर्दयी शासक चंगेज खान ने ख्वारीज्म वंशातील शासकावर आक्रमण केले तेंव्हा तेथील उत्तराधिकारी जलालुद्दीन मंगवनी त्याच्या भयाने सिंधू नदीच्या तीरावर पोहोचला आणि त्याने त्यावेळी दिल्ली च्या गादीवर बसलेल्या सुल्तान इल्तुतमिश कडे मदत मागितली.
परंतु चंगेज खानाच्या भीतीने इल्तुतमिश ने जलालुद्दीनला मदत करण्याचे नाकारले.
इतिहासकारांच्या सांगण्यानुसार या जगातील सर्वात क्रूर शासक चंगेज खानला भारताला चिरडून आसाम च्या मार्गाने पुन्हा मंगोलिया ला परतायचे होते, परंतु झाले असे कि इल्तुतमिश ने आधीच शरणागती पत्करली होती, शिवाय भीषण उन्हाळा आणि त्यात तो आजारी पडल्याने त्याने भारतात येण्याचा विचार बदलला. त्यामुळे सुदैवाने भारत चंगेज खानाच्या क्रौर्य विध्वन्सापासून वाचला.
या विश्वातील अत्यंत भयंकर शासक म्हणवल्या जाणाऱ्या चंगेज खानाचा मृत्यु ईसवीसन १२२७ ला झाला. त्याच्या मृत्यूशी संबंधित इतिहासकारांची मतं ही वेगवेगळी आहेत.
काही इतिहासकारांच्या मते त्याचा मृत्यू घोड्यावरून पडल्याने झाला. असेही म्हणतात की आपल्या मृत्युपश्चात आपली कबर कुणालाही दिसू नये अशी त्याची इच्छा होती त्यामुळे चंगेज खानाला दफन करण्याकरता गेलेल्या सगळ्या सैनिकांना मारून टाकण्यात आले.
त्याच्या मृत्युपश्चात त्याचा मुलगा ओगताई हा उत्तराधिकारी झाला तो चंगेजखानाच्या विपरीत एक अत्यंत शांतीप्रिय आणि दयाळू शासक होता. पुढे कित्येक काळ मंगोल साम्राज्याचे शासन होते.
चंगेज खान हा इतिहासातील सर्वात क्रूर निर्दयी शासनकर्ता म्हणून प्रसिद्ध झाला ज्याने जगातील अनेक भागांमध्ये विध्वंसाचा आश्रय घेत आपले साम्राज्य पसरवले आणि कित्येक मोठ्या शहरांना भुईसपाट करून प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या नष्ट केली.
त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या आजही ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करतात. वयाच्या ४१ व्या वर्षी चंगेज खानाने आपल्या विजयी अभियानाला सुरुवात केली आणि मजबूत संघटन शक्ती आणि बळाच्या सहाय्याने जगाचा बराचसा भाग आपल्या साम्राज्याने व्यापून टाकला.
चंगेज खान हा भलेही इतिहासातील क्रूर शासक होता पण त्याच्यातील सैन्य आणि युद्ध कौशल्य, समजदारी, अनुशासन, कार्याप्रती निष्ठा आणि मजबूत संघटन शक्तीच्या जोरावर जगातील अधिकाधिक भागावर आपल्या मंगोल साम्राज्याचे शासन स्थापित करण्यात तो यशस्वी झाला होता.
Who is the most brutal dictator in the world?जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा कोण?
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?,What is cryptocurrency?,Cryptocurrency Meaning In Marathi.
व्हेल माश्याची उल्टी करोडो रुपयाला .
0 टिप्पण्या